लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचा सर्वागिन विकास व ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरीकाला योग्य तो सन्मान मिळावा यासाठी, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील तरुण व जेष्ठ सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव जनसेवा पॅनेलच्या माध्यमातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. प्रचारादरम्यान मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पहाता, सरपंच या नात्याने माझ्यासह जनसेवा पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडुन येतील असा विश्वास कल्पना काळभोर यांनी संभाजीनगर येथे व्यक्त केला आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्पना काळभोर यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातुन विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, हृषीकेश काळभोर, मयुर कदम यांच्यासह सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी नव्वद कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकासकामे मार्गी लावली. विकासकामांचे श्रेय सामुहीक असतानांही, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी मात्र विकासकामांचे श्रेय स्वतःला घेण्यातच आनंद मानलेला आहे.
“मागील पाच वर्षाच्या काळात विकास नेमका कोणाचा व कुठे झाला हे मतदारांच्या चांगलेच लक्षात आले असल्याने, रविवारी होणाऱ्या मतदानात मतदारच परीवर्तन करतील असा विश्वासही जनसेवा पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार कल्पना काळभोर यांनी व्यक्त केला आहे.”
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची निवडणुक येत्या रविवारी (ता. १८) रोजी होत असुन, जनसेवा पॅनेलच्या माध्यमातुन सरपंचपदासाठी विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या पत्नी कल्पना काळभोर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबाराजे काळभोर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु काळभोर, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते प्रविण काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घऱोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. प्रचारादरम्यान ग्रामस्थांकडून कल्पना काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या दरम्यान संभाजीनगर परीसरात प्रचारा दरम्यान “पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना कल्पना काळभोर यांनी वरील विश्वास व्यक्त केला.
यावेळी जनसेवा पॅनेलचे प्रमुख यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर यांच्यासह अरुण काळभोर, सुभाष कदम, बाबासाहेब काळभोर, सुनील नाना कदम, बाळासाहेब कदम, ऋषिकेश काळभोर, देविदास कदम, प्रितम काळभोर, निलेश काळभोर, सचिन काळभोर, पांडा काळभोर, प्रा. राजेश काळभोर, बाळासाहेब गायकवाड, शरीफमामु खान, सुरेश गायकवाड, राजाराम दळवी, योगेश घुले, विजय थोरात, शेखर काळभोर, सुरेश चांदणे, जयसिंग घाडगे, दिलीप दोडके, सुशील काळभोर, अश्वित काळभोर, विलास कदम, प्रदीप गुजर, जयशिंग चंद, दादा चिंतामण घाडगे, पांडुरंग कदम, संजय चांदणे, नितीन लोखंडे, नितीन टिळेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना काळभोर म्हणाल्या, “कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत आणखी नागरीकरण वाढतच जाणार आहे. यामुळे वाढते नागरीकरण लक्षात घेऊन, ग्रामपंचायत हद्दीत पायाभुत सोयीसुविधा वाढविण्याची गरज आहे. त्यातच मागिल पाच वर्षाच्या काळात सत्ताधारी लोकांच्या दडपशाहीमुळे मतदार नाराज आहेत.
यामुळे कदमवाकवस्तीचे सुज्ञ मतदार जनतेच्या प्रश्नांची जाणीव असलेल्या जनसेवा पॅनेलच्या उमेदवारांना या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देऊन, सत्तेचे परीवर्तन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.”