मुंबई : अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत आजित पवारांवर चांगलीच आगपाखड केली आहे. शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल’, असे अजित पवार म्हटले. त्यावर काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल, असा घणाघात आव्हाडांनी केला.
अजित पवार यांनी हद्द ओलांडली
जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करण कितपत योग्य आहे. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही.
शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित
शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे. अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.