पुणे : राज्यात विधासभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आता जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवरील आपला डीपी बदलला आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी जयंत पाटील यांच्या डीपीवर तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र दिसत होते. परंतु, आता हक्क मागतोय महाराष्ट्र अशा आशयाचे आणि वज्रमूठ असलेले प्रोफाईल चित्र त्यांच्या डीपीवर ठेवण्यात आलेले दिसून येत आहे.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
दरम्यान, जयंत पाटील यांनी यांनी ट्विटर अकाऊंटवर ठेवलेल्या डिपीमध्ये असे लिहिलेले आहे की, ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी होय, ताकदीने लढू महाराष्ट्राच्या हक्कासाठी’ असा आशय असलेला डीपी ठेवला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचे पुढील कॅम्पेन हे हक्क मागतोय महाराष्ट्र या टॅगलाईनेच होणार की, यामागे आणखी काही हेतू आहे लवकरच स्पष्ट होणार आहे.
https://x.com/jayant_r_patil