Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रश्न झुलवत ठेवणारे हे सरकार नव्हे – देवेंद्र फडणवीस ;  डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ अमरावतीत पदवीधर संमेलन..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 11 January 2023, 18:13

अमरावती : गेल्या अडीच वर्षांत वसुलीचे नवनवे उच्चांक स्थापित झाले. ‘वर्क फ्रॉम होम’ तर माहिती होते. पण, ‘वर्क फ्रॉम जेल’ बघायची पाळी आली. त्यांचे राजीनामे घेण्याची तत्कालिन मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत नव्हती. शेवटी अख्खे मंत्रिमंडळच आपल्याला बदलावे लागले. आता राज्यातील नवीन सरकार प्रश्न झुलवत ठेवणारे नाही, तर गतीने निर्णय घेणारे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

अमरावती येथे भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित पदवीधर संमेलनात ते बोलत होते. अमरावती विभागातील भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या 5 वर्षांच्या सरकारच्या काळात टेक्सटाईल पार्क अमरावतीत झाला. आता पीएम मित्रामध्ये त्याचा आणखी विस्तार करायचा आहे आणि तो अमरावतीतच करायचा आहे.

राज्यात आणखी गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. उद्योगांच्या पाठिशी उभे राहण्याचेच सरकारचे धोरण आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना अशा योजना राबबून शेतकर्‍यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिलो. एका समृद्धी महामार्गामुळे येत्या 5 वर्षांत काय परिवर्तन होणार, हे तुम्ही पहाच. रस्ते हे समृद्धीचे महाद्वार असते. आता येणार्‍या काळात वैनगंगा-पैनगंगा हा 82 हजार कोटींचा प्रकल्प करणारच.

रणजित पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षकांसाठी अतिशय चांगले काम केले. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सर्व खात्यांचे राज्यमंत्री तेच होते. प्रश्नोत्तरे असोत की लक्षवेधी एकदाही मुख्यमंत्र्यांना बोलवा, म्हणून कामकाज तहकूब करण्याची पाळी आली नाही. अतिशय गांभीर्याने काम करणारे ते आहेत, असे सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ७५ हजार भरतींची जाहिरात निघाली. महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षांत पूर्णपणे भरती प्रक्रिया बंद होती.

आता आपण सरकारी नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली. गेल्या सरकारमध्ये २-४ हजार जागा काय काढल्या, प्रत्येक परीक्षेत घोटाळे केले. पूर्वीच्या सरकारांनी शिक्षकांना झुलवत ठेवले. आम्ही त्यांना ११०० कोटी रुपयांचे अनुदान दिले असले तरी त्याचा ५ हजार कोटी रुपये बोजा राज्य सरकारवर येणार आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात ज्या मागण्या होत्या, त्यात ग्रॅच्युईटी आणि फॅमिली पेन्शनचे आदेश आम्ही लवकरच निर्गमित करणार आहोत.

दरम्यान, अन्य पक्षांसाठी विकासकामे हे तोंडाच्या वाफा आहेत, आम्ही ते प्रत्यक्षात साकारण्याचे काम करतो. आम्हाला प्रश्न सोडविण्यात, जनतेत रस आहे, दुसरे आमचे कोणतेही विषय नाहीत. अडीच वर्षांत जे निर्णय झाले नाही, ते ६ महिन्यात घेण्याचे धाडस आम्ही दाखविले, असेहि फडणवीस म्हणाले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 29 April 2026, 13:55

Shirur News : न्हावरे सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे बिनविरोध..

Wednesday, 29 April 2026, 13:28

Hadapsar News : क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी तरुणाला दांडक्याने मारहाण ; पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तिघांवर खंडणीचा गुन्हा, तर एजंटांची होणार ‘चारित्र्य पडताळणी’..

Wednesday, 29 April 2026, 12:56

Daund Politics: नांदूरच्या सरपंचपदी विशाल थोरात विराजमान, रुपाली चाकणकर यांच्या भावाला पराभवाचा धक्का

Wednesday, 29 April 2026, 12:23
Next Post

दौंड येथे पोलीस चक्क मद्यधुंद अवस्थेत ऑन ड्युटी ; काय कारवाई होणार? याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.