पुणे – हंटर कमिशन आला तेव्हा ज्योतिराव फुले उभे राहिले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण द्यायला सुरुवात केली. हे सुद्धा बोलायचे नाही. मग खोट्या केसेस टाकायच्या. सगळ्या आदिवासी संस्कृतीचे जतन करायला पाहिजे. काही मंत्र्यांनी चुकीचं काम केली म्हणून आदिवासी समाजाला याचा फायदा झाला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुणे येथे आदिवासी मेळाव्यात बोलताना केली.
तसेच आपल्याला रडून काहीच मिळणार नाही. मागे कोणी वनवासी परिषद भरविली. आम्ही आदिवासी आहोत वनवासी तुम्ही आहात. आदिवासी म्हणून आम्हाला आमचे अधिकार मिळाले पाहिजे. बिरसा मुंडा यांचे काम मोठे आहे. शत्रुवर चाल करायची धमक त्यांच्यात होती. फक्त धनुष्य बाणाने त्यांनी चाल केली. धनुष्य बाणाचा त्यांनी तीर मारला. आदिवासींच्या अडविलेल्या जागा मोकळ्या करा, अशी बिरसा मुंडा यांची मागणी होती. असे देखील भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, तुमचे अधिकार मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येवून मंत्रायलावर धडक मोर्चा केला पाहिजे. तसे चमत्कार केल्याशिवाय नमस्कार मिळत नाही. इथे फक्त भुलभुलया केला जातो. देशात मोठी धरण झाली. यात आदिवासींच्या जागा गेल्या. देशात 5g आला मात्र आमची मुले हजार दोन हजारांत विकली जातात. इतकी गरिबी असेल तर हा देश कुठे गेला. इथं कोळशाच्या खाणी या आदिवासींच्या जागेवर आहेत. असे देखील ते म्हणाले आहे.
दरम्यान छगन भुजबळ यांनी रस्वतीच्या फोटोबद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकर दिले आहे. ते म्हणाले की थोडे काही बोललो की, विरोधक अंगावर येतात. माझीही परिस्थिती तीच झाली. मी फक्त बोललो सगळ्या फोटोंची पूजा शाळेमध्ये करा. सरस्वतीचा फोटो काढा, असे मी बोललो नव्हतो. शाळेत गेलं की फक्त सरस्वतीचा फोटो दिसतो. पोरांना वाटत की यांनीच हे केले.