सागर जगदाळे
भिगवण: इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडतआज गुरुवारी (२८ जुलै) जाहीर झाली आहे. इंदापूर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी आज शंकरराव पाटील सभागृह पंचायत समिती इंदापूर येथे सकाळी ११.३० वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक इच्छुकांना नव्या मतदारसंघाचा आधार घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. तर अनेकांना मतदारसंघात हवे तसे आरक्षण मिळाले असल्याने समाधानाचे वातावरण आहे. अनेक विद्यमानांना आपला मतदारसंघ आरक्षित झाल्याने दुसऱ्या मतदारसंघात संधी मिळते का..? हे पहावे लागणार आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समितीच्या गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे २ गट, तर पंचायत समितीच्या ४ गणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात ९ जिल्हा परिषद सदस्य व १८ पंचायत समिती सदस्य असणार आहेत.
इंदापूर पंचायत समिती साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये खालील गणामध्ये पुढील प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथील म्हत्रे प्रतिक विठ्ठल यांच्या हातून सोडत काढण्यात आली.यावेळी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे,तहसीलदार श्रीकांत पाटील,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते.
अनुसूचित जाती मतदारसंघ राखीव गण – ३ ज्यामध्ये वालचंदनगर, बावडा ( अनुसूचित जाती महिला) आणि लुमेवाडी अनुसूचित जाती पुरुष.
1) नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव गण -४ ज्यामध्ये
१) सणसर
२) काटी
३) माळवाडी (महिला राखीव)
४) बीजवडी (महिला राखीव)
2) खुला गण
महिला : – शेटफळगढे, बोरी, भिगवण, वडापुरी, वरकुटे खुर्द
सर्वसाधारण :- पळसदेव,निमगांव केतकी,शेळगांव,अंथुर्णे, बेलवाडी लासुर्णे