दीपक खिलारे
(Indapur )इंदापूर : निमगाव केतकी येथील सुमारे 200 वर्षांची कुस्तीची परंपरा असलेल्या प्रसिद्ध चिंचेचा कुस्ती आखाड्याच्या विकासासाठी तब्बल 25 लाखाचा निधी जिल्हा नियोजन विकास मंडळातून देण्याची घोषणा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता.3) केली. चिंचेचा कुस्ती आखाड्यामध्ये श्री केतकेश्वर यात्रे निमित्त आयोजित कुस्ती आखाड्यास हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
पाटील म्हणाले की…!
”ऐतिहासिक असलेल्या चिंचेचा कुस्ती आखाड्यास यापूर्वी आपण वॉल कंपाउंडसाठी तसेच आखाडा तयार करणेसाठी वेळोवेळी निधी दिला आहे.” निमगावचा चिंचेच्या कुस्ती आखाडा हा आपली सर्वांची शान आहे. त्यामुळे येथे स्टेडियम बांधणे व विकासासाठी रु. 25 लाखाचा निधी दिला जाईल, असे पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी राज्यभरातून आलेल्या उपस्थित मल्लांशी संवाद साधला. त्यांच्या हस्ते पै.संतोष जगताप विरुद्ध पै. पृथ्वीराज मोहोळ ही लढत लावण्यात आली.
देवराज जाधव, अंकुश जाधव, लालासाहेब पवार, दशरथ डोंगरे, विलासराव वाघमोडे, अँड.कृष्णाजी यादव, वसंत मोहोळकर, दत्तात्रय शेंडे, मच्छिंद्र चांदणे, गोरख आदलिंग, तात्यासाहेब वडापुरे, पांडुरंग हेगडे, प्रवीण डोंगरे, दादाराम शेंडे, सिकंदर मुलाणी यांचेसह राज्यभरातून आलेले मल्ल, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.