दीपक खिलारे
Indapur News इंदापूर : महाराष्ट्र राज्याची स्थापना ही पाच मूळ तत्त्वावर झाली असून कल्याणकारी राज्य, मराठी भाषकांचे राज्य, कृषी व औद्योगिक क्रांती तसेच सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन एक सामाजिक संदेश देणारे राज्य अशी गौरवशाली परंपरा महाराष्टाला लाभली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री, भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इंदापूर येथील कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी माजी मंत्री, भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले…!
कामगाराच्या प्रयत्नाने देश प्रगतीपथावर गेला आहे. यातून शक्तिशाली, बलशाही, प्रगतशील आपले वाटणारे राज्य अशी भावना महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतून झाली आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात असली पाहिजे असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी प्रा.सोमनाथ चव्हाण लिखित अफसर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पोलीस भरतीत निवड झालेल्या योगेश गार्डे यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी केले.क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ आणि प्रा.बापू घोगरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे यांनी मानले. यावेळी डॉ.शिवाजी वीर, डॉ.भिमाजी भोर, डॉ.सदाशिव उंबरदंड उपस्थित होते.