पुणे : माझ्या नियोजित दौऱ्यासाठी परदेशात गेलो होतो. कारण, नसताना मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. किमान माझ्या ऑफिसला विचारलं असतं तरी अजित पवार कुठे गेले आहेत हे कळलं असतं. उगीचच काही पण बातम्या चालवायच्या ? असं विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील एका कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार गायब असल्याने नाराज आहेत कि काय अशा चुकीच्या बातम्या देणाऱ्यांना यावेळी पवारांनी खडे बोल सुनावले.
नुकताच शिर्डी येथे राष्ट्रवादीचे अधिवेशन पार पडले. त्यातमध्ये अजित पवार हे अनुपस्थित होते. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज अजित पवार यांनी तळेगाव येथील कार्यक्रमाला हजेरी लावली.
सात दिवसांच्या कालावधीनंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या गैरहजेरी बद्दल भूमिका स्पष्ट केली.