जळगाव : विधानसभेत नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो. मी साधा माणूस नाही. त्यामुळे माझ्या नादी लागू नका अशा इशारा राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil)यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon)धरणगाव तालुक्यातील दोनगाव इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की. ‘ मी बारक्यांच्या नादी लागत नाही. संजय राऊतांसारख्या माणसाला मी घाम फोडतो असे पाटील म्हणाले. विधानसभेत नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो. भाऊ काय बोलणार आहे.
” उध्दव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेला गुलाबराव पाटील उत्तर दिले आहे. त्यातून उध्दव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर त्यांनी कडाडून टीका केली.