Manoj Jarange Patil : महाराष्ट्रात सद्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा मुद्दा तापला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. अशातच काही दिवसांसापूर्वी मी एकटा पडलो आहे, असं मनोज जरांगे यांनी विधान केलं होतं. त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. आता यावर स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मराठ्यांचे राज्य आहे आणि मग मराठ्यांवर अन्याय का…? मी एकटा पडलो नाही. मला आता मराठ्यांचे नेते फोन करत आहेत. ओबीसींचे नेते सर्व एक झाले आहेत. मग मराठे का एकत्र येत नाहीत, म्हणून मी एकटा पडलो आहे असे म्हणालो, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय.
मराठा समाजावर अन्याय का?
आता मी थेट अंतरवाली जाणार आहे. देवाचे दर्शन घेणार आहे. सर्व राज्य म्हणत आहे की हे मराठ्यांचं राज्य आहे. तर मग मराठा समाजावर अन्याय का? मी धनगर बांधवांना आणि यांच्या नेत्याला विरोधक मानत नाही.बघा पुढे मोठा धमाका होणार आहे. शंभराजे देसाई म्हणाले आहेत 13 जुलै पर्यंत थांबा…, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
डॉ. तारख यांना काळे फासले. हेबघून मला वाईट वाटले. आंदोलनाला गाल बोट लावण्याचे असे काम चांगले नाही. डॉक्टरकडून एक चूक झाली असेल ते आम्ही सोडून दिले आहे. शेवटी समाजाचे आंदोलन आहे. डॉ. तारख यांना माहीत आहे, मी असे काही करत नाहीत. मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडवणीस यांनी दखल घेतली असेल. म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवला असेल. येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढू तर दंगल होण्याची भीती वाटत असेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.