(Hasan Mushrif ) कोल्हापूर : समाजासाठी मुश्रीफ साहेब एवढं काम करतात. मात्र, असे असले तरी ईडीकडून त्यांना त्रास दिला जात आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात, आम्हाला गोळ्या मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने दिली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांचा पुन्हा छापा…!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी शनिवारी पहाटेच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा छापा टाकला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ईडी आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय आणि कोल्हापूर पोलीस दलाचा मोठा फौजफाटा मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेला आहे. मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीची धाड पडली आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता विविध स्तरातून याबाबतच्या प्रतिक्रिया येत असून हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी नसल्याचे समजत आहे.
दरम्यान, त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात येत असून हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते कागल येथील निवासस्थानी एकत्रित जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि तपास करण्यात कोणतीही बाधा येऊ नये यामुळे केंद्रीय पोलीस फोर्स आणि कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आलेला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर यांच्या घर व कार्यालयावर ईडीचा छापा!
पत्राचाळ प्रकरण : खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी!