पुणे : शिरुर मतदार संघातील डॉक्टर, सीए, वकील, बिल्डर, उद्योजक डेव्हलपर्स, प्रवचनकार, कीर्तनकार महाराज, भारतीय सुरक्षा दल, आर्मी, ऐरफोर्स यांनी केलेल्या मागण्या समजून घेऊन संसदेत मांडून पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री रेणुका सिंह यांनी दिले आहे.
वाघोली (ता. हवेली) येथील हॉटेल शेंग्रीला या ठिकाणी शिरूर लोकसभा संसद प्रवास योजनेतील मतदार संघातील सर्वात सुंदर आणि आनंददायी कार्यक्रम झाला असे सांगून कार्यक्रमाची स्तुती केली. तसेच रात्री उशिरा पर्यत मान्यवरांना मार्गदर्शन करून वरील सर्वांशी संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी रेणुका सिंह बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटिल यांनी करून कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे स्वागत केले व मतदार संघांची माहिती मांडली. तर हवेली युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी सर्व मान्यवरांसमोर प्रास्ताविक करून शिरूर लोकसभेची संक्षिप्त माहिती व केंद्र सरकारने केलेले विकास कार्य व भविष्यातील समग्र विकासासासाठी आवश्यक योजना, समस्या विषयी माहिती सादर केली. तसेच कामगार जिल्हा संघटनेचे नेते विजय हरगुडे यांनी सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाचा नियोजनाची संपुर्ण जबाबदारी वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी पार पाडली.
यावेळी पर्वती मतदार संघाच्या कार्यक्षम आमदार माधुरी मिसाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, भाजप महाराष्ट्र सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रविन काळभोर, तालुका अध्यक्ष संदिप भोंडवे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, व्यापारी आघाडीचे जयप्रकाश सातव, पंचायत समिती सदस्य शामभाऊ गावडे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण दुकाने, सरचिटणीस गणेश चौधरी-विजय जाचक, पी.एम.आर.डी.चे सदस्य स्वप्नील उंद्रे, वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव, युवा मोर्चा सरचिटणीस योगीराज शिंदे, हवेली तालुका उपाध्यक्ष संतोष तांबे,रावसाहेब राखपसरे उपाध्यक्ष अनुसूचित मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व वाघोलीतील सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.