राहुलकुमार अवचट
यवत- सशस्त्र सेना चिकिस्तक महाविद्यालय दौंडच्या पश्चिम भागात आदर्श आरोग्य सेवा देत आहे. आणि सेवा देताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न आहे. अशी ग्वाही दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
सशस्त्र सेना चिकिस्तक महाविद्यालय पुणे व ग्रामपंचायत कासुर्डी (ता. दौंड), आरोग्य विभाग दौंड यांचे संयुक्त विद्यमाने कासुर्डी येथील दवाखान्याच्या वीन विस्तारित इमारतीचे उदघाटन आणि वर्धापन दिनाचे आयोजित करण्यात आला होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना वरील ग्वावी आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. यावेळी सशस्त्र सेना चिकिस्तक महाविद्यालयाचे लेफ्टनंट जनरल रामा सेधु, ब्रिगेडियर एस. के. कौशिक, एयर व्हाईस मार्शल राजेश वैद्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कुल म्हणाले कि, सशस्त्र सेना महाविद्यालय ग्रामीण भागात जनतेला चांगली आरोग्य सेवा देत असुन याचा अभिमान व आनंद आहे, यावेळी सशस्त्र सेना चिकिस्तक महाविद्यालय पुणेचे महासंचालक रजत दत्त यांनी ग्रामीण भागातील जनतेने वैदकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, अशोक नांदापुरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, यवत ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ,सुरेखा पोळ, कासुर्डी सरपंच धनश्री विशाल टेकवडे, ग्रामपंचायत सदस्य यांचेसह ग्रामस्थ आणि रुग्ण उपस्थित होते