(Hasan Mushrif ) मुंबई : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर इडीने कारवाई केली. त्यानंतर मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यत वर्तवण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने त्यांना दिलासा मिळाला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. तसेच मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
याचिकेवरील सुनावणी तूर्तास हायकोर्टाकडून तहकूब..!
यासोबतच सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करावी, असे निर्देशन हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांच्यावरील सध्या तरी अटकेची कारवाई टळणार आहे. असे असले तरी गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास हायकोर्टाकडून तहकूब करण्यात आली आहे.
हायकोर्टानं मूळ प्रकरणात दिलासा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीनं छापेमारी सुरू केली होती. आमदार या नात्यानं आपण सध्या विधानसभेत व्यस्त असल्याची मुश्रीफांच्या वतीनं हायकोर्टात माहिती देण्यात आली. त्यावर बोलताना ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टात युक्तिवाद केला.
ईडी सध्या करत असलेल्या तपासात हसन मुश्रीफांना आरोपी बनवलेलंच नाही. त्यामुळे तूर्तास त्यांच्या अटकेचा प्रश्नचं नाही. सध्या तपासअधिकारी प्राथमिक तपास करत आहेत. त्यांच्या तिन्ही मुलांनी या प्रकरणात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलेला आहे. जर त्यांना अटकेची भिती असेल तर त्यांनीही रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असा युक्तीवाद ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टात केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा ईडीची छापेमारी ; तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी
Crime News : एनआयएचे पुण्यात छापे ; काय आहे नेमके प्रकरण!