अजित जगताप
सातारा : खटाव तालुक्यातील हिंगडे गावच्या हद्दीत वडून नगरपंचायतीच्या कचरा संकलन प्रकल्प सुरू केलेला आहे सदरचा कचरा हिंगणे गावच्या शिवारात पसरत आहे त्यामुळे ग्राम स्वच्छता हिंगणेला पण स्वागत होते वडूच्या कचऱ्याने अशी परिस्थिती आहे.
या विरोधात हिंगणे ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखा हिंगणे यांनी खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिलेला आहे याबाबत वडूज ते हिंगणे या रस्त्यावर वडूज नगरीचा कचरा टाकण्यासाठी भाडेतत्त्वावरती जागा घेण्यात आलेले आहे या ठिकाणी कोणताही कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही वीज नाही यंत्रणा नाही. त्यामुळे वडूज नगरीतील साचलेला कचरा या ठिकाणी अक्षरशा खुल्या मैदानात टाकण्यात येतो सदरचा कचरा वादळ वाऱ्याने आजूबाजूच्या परिसरात पसरून दुर्गंधी येते.
या ठिकाणी भटके पशुपक्षी प्राणी यांचा प्रादुर्भाव होत असलेले सदर परिसरात यजा करताना नाकाला पदर किंवा रुमाल लावावा लागतो अनेकांचे आरोग्याला धोका निर्माण झालेले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिलेले आहे सदर निवेदनाचा सहानभूतीपूर्वक विचार न केल्यास तीव्र आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे. असा इशारा हिंगणे गावचे सरपंच.शालन शिवाजी दुबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन निकम, श्रीमंत कोकाटे ,रामदास शिंदे, हिराचंद घनवट, धीरज निकम, विकास काळे, स्वप्निल काळे ,बाळासो पाटोळे, वामन निकम, बाळासो ढोले, शामराव काळे आदी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी दिलेला आहे
दरम्यान सदर निवेदनाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून संयुक्त बैठक घेण्यात येईल व हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन तहसीलदार किरण जमदाडे यांनी ग्रामस्थ व शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांना दिले आहे.