Gram Panchayat Election Result : नागपूर : राज्यातील काही भागातंत ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहे. अनेक गावांमध्ये सत्ताबदल झाली आहे. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अनपेक्षित निकाल लागले आहेत. विदर्भातही बीआरएसने आपलं खात उघडत चांगली कामगिरी केली आहे.
एकीकडे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात मतदारांनी भरभरुन यश दिले. तर दुसरीकडे, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना चांगलाच फटका बसला आहे. परंतु विदर्भातला बीअरएसचा निकाल अधिकच धक्कादायक आहे. भंडारा या नाना पटोले यांच्या जिल्ह्यात राव यांच्या पक्षाने दमदार कामगिरी केली आहे.विदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने काँग्रेसला धक्का दिला आहे. विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकीत के सी राव यांच्या बीआरएस पक्षाने नऊ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे.
केसी राव यांनी काही महिन्यांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात सभा घेतल्या होत्या. शेतकऱ्यांच्या कांद्याला त्यांनी चांगले दर मिळवून दिले. के.सी. राव यांच्या झालेल्या सभानंतर ही पहिलीच निवडणूक होती. पक्षाच्या चांगल्या कामगिरीचा उल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केला. मात्र त्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. जरी आता बीअरएसचा फटका काँग्रेसला बसला असला तरी भविष्यात भाजपसाठीही हा पक्ष धोक्याची घंटा होऊ शकतो.