राहुलकुमार अवचट
यवत बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मतदार संघातील अनेक गावांचा दौरा केला असुन उद्या आणि आज गॕसची दरवाढ झाली दसरा दिवाळी सणांच्या तोंडावर सरकारणे गॅस चे दर वाढवले तर वर्षाला १५ सिलिंडर यामुळे महाराष्ट्रातील जनतेला सरकारने महागाईचे बक्षीसच दिल्याची टीका त्यांनी गावभेटी दौऱ्यात केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती लोकसभा मतदार संघातील पडवी, देऊळगाव गाडा, खोर, भांडगाव, यवत, कासुर्डी, भरतगाव, ताम्हणवाडी, बोरीऐंदी या गावांचा रात्री उशीरापर्यंत दौरा केला सरकारने फक्त मोठ्या जाहिराती केल्या आणि महागाई वाढवली सर्वसामान्य जनता यामध्ये भरडली जात आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी होत असतो मग शिंदे गटाने सुडबुद्धीने दसरा मेळावा का घेतला ? मुख्यमंत्री दररोज मेळाव्याची तयारीचा आढावा घेण्यासाठी मेळावा ठिकाणी जाऊन भेट देऊन चाचपणी करतात हेच दोन तास जर मंत्रालयात दिले तर महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल.जर मेळावे घेऊन महागाई कमी होणार असेल तर आणखी दहा मेळावे घ्या याबरोबरच केंद्र सरकारवर ही त्यांनी टिका केली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्याने त्यांनी सत्यमेव जयते म्हणत न्यायालयाचे आभार मानले.
यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे, महिला सरचिटणीस वैशाली नागवडे, योगिनी दिवेकर,वंदना मोहिते, राणी शेळके, माजी उपसभापती नितीन दोरगे, सरपंच संतोष दोरगे,युवानेते गणेश थोरात,कुंडलिक खुटवड, यवत ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.