शिरूर : आंबेगाव शिरूर मतदारसंघातील रांजणगाव- कारेगाव व टाकळी हाजी- कवठेयेमाई व पाबळ – केंदूर जिल्हा परीषद गटाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत २ कोटी २३ लाख रुपयांचा निधी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. त्यामधून विविध योजनेतील कामे केली जातील. अशी माहिती सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिली.
टाकळी हाजी- कवठे जिल्हा परीषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे व रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद माजी सदस्या स्वातीताई पाचुंदकर व जिल्हा परिषद माजी सदस्या सवीता बगाटे यांनी आभिनंदन केले आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव – कारेगाव, टाकळी हाजी- कवठे येमाई, पाबळ- केंदुर जिल्हा परिषद गटातील गावांसाठी डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षासाठी रुपये २ कोटी २३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे.
दरम्यान, डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच सभागृह, गटार, बुद्धविहार यांची कामे केली जाणार आहेत. मंजूर झालेली विकासकामे व निधी पुढीलप्रमाणे :
रांजणगाव- कारेगाव जिल्हापरिषद गट
रांजणगाव दलितवस्ती येथे समाजमंदिर बांधणे १० लाख, बाभुळसर खुर्द आंबेडकरनगर येथे काँक्रिटीकरण ५ लाख, बाभुळसर खुर्द अण्णा भाऊ साठेनगर येथे अंतर्गत गटार योजना ५ लाख, खंडाळे दलितवस्ती अंतर्गत रस्ते सुधारणा १० लाख, पिंपरी दुमाला डोळसवस्ती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधणे ५ लाख, गणेगाव खालसा कामिनी नदी ते मातंगवस्ती रस्ता १० लाख, पिंपळे धुमाळ दलितवस्ती अंतर्गत रस्ता १० लाख कारेगाव दलितवस्ती अंतर्गत रस्ता १० लाख, निमगाव भोगी दलितवस्ती कर्जाईमळा रस्ता १० लाख, चिंचोली मोराची, थोपटेवस्ती ते लहुजीनगर रस्ता सुधारणा करणे ५ लाख. सुधारणा १० लाख, हिवरे दलितवस्ती रस्ता सुधारणा १० लाख,
टाकळी हाजी- कवठे येमाई जिल्हा परिषद गट
टाकळी हाजी- शिनगरवाडी मंदिर रस्ता ७ लाख, मलठण मातंगवस्ती येथे दत्तमंदिर सभागृह बांधणे ७ लाख, जांबुत, वडनेर रोड ते विकास सोनवणे यांच्या घराकडे जाणारा रस्ता ७ लाख, सविंदणे गावठाण दलितवस्ती बुद्धविहार बांधणे ७ लाख, फाकटे दलितवस्ती रस्ता ७ लाख, चांडोह हायस्कूल ते मराठी शाळा रस्ता ७ लाख, कवठे येमाई येथे हरिजनवस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, टाकळी हाजी मळगंगा मंदिर ते चर्मकारवस्ती रस्ता ७ लाख,
पाबळ-केंदुर जिल्हा परिषद गट
जातेगाव खुर्द, लक्ष्मी मंदिर येथे सभामंडप करणे १० लाख, मुखई दलितवस्ती अंतर्गत रस्ता करणे १० लाख, जातेगाव बु. दलितवस्ती समाजमंदिर दुरुस्ती १० लाख, करंदी सोनवणेवस्ती अंतर्गत रस्ता १० लाख, खैरेनगर- सोनवणेवस्ती ते स्मशानभूमी रस्ता हरिजनवस्ती रस्ता ७ लाख, केंदूर येथील हरिजन मातंगवस्ती अंतर्गत रस्ता १० लाख, केंदूर- सुकेवाडी येथील मातंगवस्ती समाजमंदिराकडे जाणारा रस्ता १० लाख,