Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच प्रमोद कृष्णा बोधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.(Uruli Kanchan News)
प्रमोद बोधे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा.
सोसायटीचे अध्यक्ष सुरेश भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संजय ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २९) हि निवडणूक घेण्यात आली. या निवडणुक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी प्रमोद बोधे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संजय ससाणे यांनी अध्यक्षपदी प्रमोद बोधे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. सोसायटीचे सचिव हनुमंत जगताप यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.(Uruli Kanchan News)
यावेळी उपाध्यक्ष बबईबाई काकडे, संचालक सुरेश भोसले, ताराचंद कोलते, संजय भोसले, अंकुश कड, लोकेश कानकाटे, संभाजी शितोळे, सुरेश काकडे, राजेंद्र शिंदे, जितेंद्र पवार, चारुशीला सरडे, स्वीकृत संचालक संदिप कड, भगवंत शिंदे, विजय कानकाटे, सरपंच विठ्ठल शितोळे, ग्रा.प.सदस्य मंगेश कानकाटे, माजी उपसरपंच नारायण शिंदे, विलास कानकाटे बबन कोलते, जयसिंग भोसले, मुकिंदा काकडे, अशोक कारंडे, सचिन कड, शुभम कोलते, आदी उपस्थित होते.(Uruli Kanchan News)
शेतकऱ्यांच्या संदर्भात असणाऱ्या समस्या संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद बोधे यांनी सांगितले.