चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे (वय-८२) यांचे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याच्या निधानामुळे राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात ख्याती होती. टेमुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. टेमुर्डे यांनी १९९९ ते २००० या १० वर्षाच्या काळात दोनवेळी वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. तर १९९१ -९५ या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते. अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत होता मोठा वाटा होता.
अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे वरोरा येथील राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वरोरा येथील राहत्या घरी ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे.‘माझ्या मृत्यूनंतर माझा देहाला अग्नी देवू नका, माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा,असा संकल्प मोरेश्वर टेंभुर्डे यांनी केला होता. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे.