हिंगोली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तसेच माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेडमधील डॉ. काबदे हॉस्पिटल येथे खासगी रुग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
रविवारी (दि.18) प्रकृती अस्वस्थ वाटल्याने नांदेड येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 12 वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रजनी सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आई आणि विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्या त्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याचे आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषविले होते. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील होत्या. सातव घराणे गेल्या ४३ वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही सातव कुटुंबाला ओळखले जाते.