दीपक खिलारे
इंदापूर : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे शनिवारी (ता. ७) रोजी इंदापूर येथील दूधगंगा येथे दुपारी १ ते ३ वाजता नववर्षानिमित्त नागरिकांची सदिच्छा भेट घेऊन सुसंवाद साधणार आहेत.
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील दरवर्षीप्रमाणे नववर्षानिमित्त नागरिकांशी हितगुज करीत त्यांच्याशी संवाद साधत स्नेह वृद्धिंगत करीत असतात. यावेळी नागरिक देखील विविध विषयावर संवाद साधत आपला आनंद द्विगुणित करीत असतात.