लोणी काळभोर (पुणे)- मुख्यमंत्री कार्यांलयाने तीन दिवसापर्वी खडकवासला ते स्वारगेट-हडपसरमार्गे लोणी काळभोर या दरम्यान लवकरच मेट्रोमार्ग सुरु होणार असल्याचे एका ट्विटच्या माध्यमातुन जाहीर केले आहे. हा मार्ग नागपुर मेट्रोच्या धर्तीवर दुमजली होणार असल्याचे जाहीर केले आहे.
तर दुसरीकडे शिरुरच्या आजी-माजी खासदारांनीही केंद्रियमंत्री नितीनजी गडकरी यांना भेटुन, पुणे-सोलापूर महामार्गावर भैरोबानाला ते उरुळी कांचन (खेडेकर मळा) या दरम्यान नगर रोडच्या धर्तीवर दुमजली उड्डानपुलाची मागणी करणार असल्याचे जाहीर केल्याने, पुणे-सोलापूर महामार्गावर स्वारगेट ते उरुळी कांचन या दरम्यान लवकरच उड्डाणपूल होणार अशा पुर्व हवेलीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात शनिवारी (ता. २०) सकाळी सात वाजनेच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात, गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या सख्ख्या शाळकरी बहिणींचा मृत्यु झाला होता. तर त्याच्या एक दिवस अगोदर अथर्व साळुंके या सतरा वर्षीय युवकाचा एमआयटी कॉर्नरवर झालेल्या अपघातात मृत्यु झाला होता. पाच दिवसात तीन जणाना प्राण गमवावे लागल्याने, पुणे-सोलापूर महामार्गावर भैरोबानाला ते उरुळी कांचन या दरम्यान लवकरच उड्डाणपूल मागणी होऊ लागली आहे.
याच दरम्यान शिरुरच्या आजी-माजी खासदारांनीही मागील तीन दिवसापासुन भैरोबानाला ते उरुळी कांचन (खेडेकर मळा) या दरम्यान नगर रोडच्या धर्तीवर दुमजली उभारण्यासाठी केंद्रियमंत्री नितीनजी गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, वरील प्रश्नाबाबत मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री कार्यालयाने तीन दिवसापुर्वी मेट्रोच्या नवीण मार्गाबाबत पत्रकारांना माहिती देतांना खडकवासला ते स्वारगेट-हडपसरमार्गे लोणी काळभोर या दरम्यान लवकरच मेट्रोमार्ग सुरु होणार असल्याचे एका ट्विटच्या माध्यमातुन जाहीर केले आहे.
हा मार्ग नागपुर मेट्रोच्या धर्तीवर दुमजली होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर स्वारगेट ते उरुळी कांचन या दरम्यान लवकरच उड्डाणपूल होणार या चर्चेला तोंड फुटले आहे. गरज आहे ती आजी-माजी खासदारांच्याबरोबरच, पुर्व हवेलीमधील नेत्यांनी व पुर्व हवेलीमधील सर्वच ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची.
याबाबत बोलतांना विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, पुणे-सोलापूर महामार्गावर स्वारगेट ते उरुळी कांचन या दरम्यान मागिल कांही वर्षापासुन वहातुकीची कोंडी होणे ही बाब नित्याचीच बनली आहे. यामुळे या मार्गावर अपघातही मोठ्या प्रमानात होत आहेत. कदमवाकवस्ती हद्दीत मागिल पाच दिवसात तीन शाळकरी मुलांना प्राण गमवावे लागणे ही बाब अतिशय दुःखद आहे.
या मार्गावर होणारी वहातुकीची कोंडी व सततचे अपघात लक्षात घेऊन, नितीन गडकरी यांच्याकडे पुणे-सोलापूर महामार्गावर भैरोबानाला ते उरुळी कांचन (खेडेकर मळा) या दरम्यान नगर रोडच्या धर्तीवर दुमजली उड्डानपुलाची मागणी करणार आहे. याबाबतच्या मागणीच्या पत्रासह पुढील आठवड्यातच गडकरी यांची भेट घेणार आहे.
दरम्यान पुर्व हवेलीमधील ग्रामस्थांच्या वतीने बोलतांना उद्योजक मनिष अशोकराव काळभोर म्हणाले, मुख्यमंत्री कार्यांलयाने तीन दिवसापर्वी खडकवासला ते स्वारगेट-हडपसरमार्गे लोणी काळभोर या दरम्यान लवकरच मेट्रोमार्ग सुरु होणार असल्याचे एका ट्विटच्या माध्यमातुन जाहीर केले आहे. हा मार्ग नागपुर मेट्रोच्या धर्तीवर दुमजली होणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. मात्र स्वारगेट ते उरुळी कांचन या दरम्यान दुमजली उड्डाणपुल झाल्यास, पुणे-सोलापूर महामार्गावर स्वारगेट ते उरुळी कांचन या दरम्यानची वहातुकीची समस्या नव्वद टक्के सुटणार आहे.
यामुळे आजी-माजी खासदार, या भागाचे आमदार अशोक पवार, हडपसरचे आमदार चेतन तुपे, सुनिल कांबळे व दौंडचे आमदार राहुल कुल या सर्वांनी एकत्र येत वरील मार्गावर उड्डामपुलाची मागणी करण्याची गरज आहे. व त्याचा पाठपरावाही कऱण्याची गरज आहे. त्याचवेळी मागील वीस वर्षापासुन होणार-होणार असा सतत गाजत असलेल्या रिंगरोडचे ही काम सुरु होण्याची गरज आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाल सुरु होणे हीच मागिल पाच दिवसात बळी पडलेल्या तीन मुलांना श्रध्दांजली ठरणार आहे.