पुणे : विधानसभा निवडणुकांमधील पाच राज्यांचा निकाल आज जाहिर होणार होता. मात्र, निकालाच्या दोन दिवस आधीच मिझोरममधील मतमोजणी एक दिवस पुढे अर्थात ४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. यामुळे इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण येथे आज (रविवार, ता. ३) मतमोजणी होणार आहे. मिझोराममध्ये उद्या, सोमवारी मतमोजणी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकींची रंगीत तालीम म्हणून या नुवडणुकांकडे पाहिले जाते.
* या चार राज्यांमधील सद्यस्थिती
– राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. पुढे कोण, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
– छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. येथे प्रचार देखील रंगतदार झाला होता. आज मतदारांचा कौल कळणार आहे.
– मध्य प्रदेशात भाजप, तर तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती सत्तेत आहे.
– तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समिती प्रमुख स्पर्धक असून, सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी के. चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत. आज भवितव्य कळणर आहे.
* कोठे किती जागा?
– राजस्थान १९९
– मध्य प्रदेश २३०
– छत्तीसगड ९०
– तेलंगण ११९
* निकालाबाबत उत्सुकता
मतदानानंतरच्या कलचाचण्यांमध्येही एकसूर नसल्याने निकालाबाबत अधिकच उत्सुकता आहे. मध्य प्रदेशात एकूण २३०, छत्तीसगडमध्ये ९०, तेलंगणमध्ये ११९, तर राजस्थानात १९९ जागांसाठी मतदान पार पडले आहे. मतमोजणी केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे