दिनेश सोनवणे
दौड : दौंड रेल्वे माल धक्क्यात अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस नोंदी केल्या जात असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाने केला आहे.
अधिकाऱ्यांना हाताशी धरून दौंड रेल्वे माल धक्क्यामध्ये हुंडेकरी आणि नोंदीत नसलेल्या कामगारांना बेकायदेशीरपणे पुणे माथाडी बोर्डातील अधिकाऱ्यांनी नोंदी केल्या आहेत. त्याविरोधात दौंड येथील नगररमोरी चौकामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
दौंड रेल्वे माल धक्क्यात बेकायदेशीर नोंदीत कामगारांना काम करण्याची परवानगी दिली असल्याने कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला पुणे माथाडी बोर्डाच्या अधिकारी जबाबदार राहतील. हुंडेकरांनी कित्येक वर्ष पस्तीस टक्के लेवी बुडवल्या आहेत. तसेच पस्तीस टक्के लेवी भरलयाशिवाय हुंडेकरांना काम करण्याचे परवानगी देऊ नये. अशा विविध मागण्यांसाठी गेली आठ दिवसापासून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, जर अधिकाऱ्यांनी रेल्वे माल धक्क्यामध्ये बेकायदेशीर नोंदीत असलेल्या कामगारांना जर काम करण्याला परवानगी दिली. तर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पुणे माथाडी बोर्डातील अधिकारी जबाबदार राहतील. असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाने सांगितले आहे.
यावेळी बोलताना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमित सोनवणे म्हणाले, हे आंदोलन गेल्या 8 दिवसांपासुन सुरू आहे.. जर मागण्या मान्य केल्या नाही तर दौंड मधुन जाणारा मनमाड सांगली महामार्ग रोखण्यात येणार आहे. असा कडक इशारा दिला आहे.