Educational News शिरूर : राज्य शासनाने विविध विभागाच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसारीत केल्या आहेत. ७५ हजार पद नोकर भरतीचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. (Educational News)त्यामध्ये सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १ हजार रूपये तर मागासवर्गीयांना ९०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे खेड्यातील बेरोजगार युवकांपुढे किती विभागाचे अर्ज भरावयाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षेभरात परिक्षांच्या अर्जांवर किती खर्च भरावयाचा असा प्रश्न या बेरोजगार तरूणांपुढे निर्माण झाला आहे. (Educational News)
निवडणुकाजवळ आल्याकी तरूण मतदारांना आकर्षीत करण्यासाठी देशात वेगवेगळे फंडे तयार केले जात आहे. बेरोजगार तरूणाचा महत्वाचा प्रश्न लक्षात घेऊन ठिकठिकाणी रोजगार मेळावे आयोजीत करण्यात येऊ लागले आहेत.
राज्यातील सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ७५ हजार शासकिय नोकर भरती करण्याचे उद्दिष्ठ आखण्यात आले आहे. त्यानूसार विविध विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रकाशन सुरू झाले आहे. जाहिरातीतील रिक्त पदांची संख्या पहाता उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे मागील काळात भरती न झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरी देखील राज्यात महसूल व वनविभाग तसेच विविध पातळीवर पद भरतीासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातून अवास्तव परिक्षा शुल्क आकारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परिक्षा सहित आॅनलाईन अर्ज करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. नोकर भरती साठी परिक्षा शुल्क ९०० रूपये मागासवर्गीयांना तर एक हजार रूपये खुल्या प्रवर्गासाठी आकारण्यात येत आहे.
शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून नोकरी मिळत नसल्याने बेरोजगार तरूणांची मानसिकता खालावलेली आहे. त्यातून पदसंख्या व अर्ज करणाऱ्या तरूणांची संख्या पहाता नोकरी मिळणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आकारला जाणारे परिक्षा शुल्क ही बेरोजगार तरूणांसाठी खर्च करण्याबाबतचे आवाहन तसेच शासनाने केलेली थट्टाच आहे. असे सुशिक्षित बेरोजगार तरूण बोलू लागले आहेत.
शैक्षणीक अर्हता असताना देखील विविध पदासाठी अर्ज करताना एवढे परिक्षा शुल्क भरणे कसे शक्य होईल. आर्थीक दृष्ट्या बिकट परिस्थितीत असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांसमोर परिक्षा शुल्क भरण्याचे आवाहन निर्माण करणारे ठरू लागले आहे. सध्या शेती व्यवसायात भांडवल वसूल होत नाही. त्यातून सर्व सामान्य कुटूंबातील मुलांना नोकरी नाही. मागील काळात शिक्षण असून नोकरी चे स्वप्न धुळीस मिळाल्यांची संख्या मोठी आहे. भरमसाठ परिक्षा शुल्कामुळे अर्ज न भरणाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही कमी पदसंख्येत मोठ्या प्रमाणात नोकर भरतीसाठी अर्ज भरले जात आहेत.
परिक्षा शुल्क नाममात्र शुल्क आकारावे…
गेल्या काही वर्षापासून केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर जाहिराती काढून तरूण बेरोजगारांची दिशाभूल करण्याचे काम संबधीत सरकार करत आहेत. परिक्षा शुल्क व पदभरती संख्या पहाता फक्त तरूण बेरोजगारांच्या खिशातील पैसा तिजोरीत भरण्याचे काम होत आहे. या बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. यासाठी तरूणांनी जागरुकता दाखवणे गरजेचे आहे. सरकारी धोरण लुटारूचे असल्याने कितपत तरूणांना रोजगार मिळेल यात शंका आहे. इतर ठिकाणी कोट्यावधी रूपये खर्च केला जातो. मग या बेरोजगार तरूणांसाठी परिक्षा शुल्क हे नाममात्र शुल्क आकारले जावे. तरूणांदेखील गुणात्मक व दर्जात्मक अभ्यास करून या स्पर्धेत परिक्षांना सामोरे जावे. सरकारने देखील परिक्षा शुल्क कमी करावे. खेड्यातील बेरोजगार तरूणांपुढे आवास्तव परिक्षा शुल्काचा गंभीर प्रश्न सध्या उभा आहे.
देवदत्त निकम (माजी सभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर)
प्रतिक्षा केवळ परिक्षेची अन निकालाची…
वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांमधून विद्यार्थी आपले नशीब अजमावत असतात. केंद्र व राज्यातून अशा वेगवेगळ्या परिक्षांना त्यांना सामोरे जावे लागते. शैक्षणिक व स्पर्धा परिक्षांचा खर्च त्यातून अवास्तव क्लासेस चा खर्च पहाता तरूण विचीत्र परीस्थीतीला सामोरे जात आहेत. वर्षात जवळपास केवळ परिक्षा शुल्कासाठी १५ ते विस हजार रूपये मोजावे लागत आहे. त्यातून कोट्यावधी शुल्क सरकारच्या तिजोरीत जात आहेत. परिक्षा रद्द झाल्यावर पुढे सगळाच अंधार निर्माण होतो. सुरू होते फक्त प्रतिक्षा ती केवळ परिक्षेची अन निकालाची. यासाठी नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.