अजित जगताप
सातारा : किसन वीर, केशवराव पाटील,विलासकाका पाटील यांनी विचारांचे व विकासाचे राजकारण शिकविले आहे. मुलगा असो की, मुली पण,सर्वांनीच अडचणीच्या काळात सहकार्य केल्याने चिंता मिटली आहे. आता अनेकांची जिरवयाची आहे असा राजकीय टोला लगावत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुकले आहे.
पडळ (ता. खटाव) येथील के एम शुगर लिमिटेड साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या ५९ व्या वाढदिवस साजरा करताना ते बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, संगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर ,जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई, डॉ सुरेश जाधव, सौ इंदिरा घार्गे,रणजितसिंह देशमुख, सदाशिव खाडे,सौ मनिषा काळे,मनोज घोरपडे,चंद्रकांत जाधव, पोपट पाटील,संदिप पोळ, संग्राम घोरपडे, सागर साळुंखे, शिवाजीराव शिंदे,तानाजीराव पवार,डॉ महेश गुरव, मोहन देशमुख, सर्जेराव देशमुख, प्रिती घार्गे,भरत जाधव, राजेश पाटील-वाठारकर, विठ्ठल फडतरे,प्रिया घार्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार घार्गे पुढे म्हणाले, कारखाना कार्यस्थळावर एका दुर्दैवी घटनेत माझे नाव दिले.अनेक दिवस जेलमध्ये असूनही सर्वांनी सहकार्य करून सातारा जिल्हा बँकेत निवडुन आणले. आता राजकारण सोडणार नाही. अनेकांची जिरवयाची आहे. असा गर्भित इशारा देऊन श्री घार्गे यांनी साखर कारखान्याच्या प्रगतीचा आलेख मांडला.
सातारा जिल्हा बँकेत कोणीही मालकी सांगू नये.ब्रिटिशांना न घाबरणार खटाव तालुका आहे. कोणाच्या गुलामात राहणार नाही,१९४२ साली क्रांती घडवून आणली आहे.हुतात्मा स्मारक घोषित करण्यात आल्यानंतर या तालुक्यात राज्यपाल व मुख्यमंत्री एकत्र आले होते. स्वभिमानाने रहा. खटाव, माण, कोरेगाव वर अन्याय झाला.७५वर्षे झाली मंत्री नाही. अभ्यास करणार कार्यकर्ते आहे.प महाराष्ट्र मध्ये २५ टी एम सी पैकी,माण-खटाव अडीच टी एम सी पाणी राखीव ठेवले आहे.धुळदेव, महाबळेश्वर ला जातो.माईकवरून घोषणा करून कामे होत नाहीत लढण्याची भूमिका आहे. माणसं ओळखण्यासाठी चुकलो, सामान्य माणसं घेतली पाहिजे,असे ही नमूद केले.
डॉ,दिलीप येळगावकर म्हणाले, श्री घार्गे व आमच्या मध्ये साम्य आहे.सातारा येथील शासकीय रुग्णालयात एकाच खोलीत होतो, एकत्र लढलो, कोणत्या पक्षात आहे, आम्हाला माहीत नाही. माझी जिरली पण, त्यांची जास्त जिरली नाही. नवीन योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला. पत्नी, मुलीनी साथ दिली पण, ज्या पक्षाला ताकद दिली त्यांनी गद्दारी केली.असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता त्यांनी टीका केली. सातारा जिल्हा बँकेत दहाचे श्री घार्गेसाहेब तेरा करतील, ज्यांना सत्तेच्या सावलीत याचे असेल तर पाठीशी खंबीरपणे उभे रहा,माझे औषध कडू पण एफिकटिव्ह असतात. माण-खटाव मध्ये नको ती गाबड आलं आहे. आज लोकशाही व बाबू दिवस आहे.याची ही विरोधकांना आठवण करून दिली.केंद्र सरकारची मदत लागेल, लायकी व अभ्यास नसलेली मंडळी चुकीची माहिती देत आहे. येथे बसलेली माणसं पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतील असे ही स्पष्ट केले
आ. शहाजीबापू पाटील भाषणाला उभे राहताच काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल,, गाण्याने जमलेले अनेकांजण सरसावले,त्यानंतर ते म्हणाले, प्रभाकर घार्गे यांनी महान काम केले आहे.माझा हात कर्तव्य माणसाचा सत्कार करण्याइतका मोठा आहे का? त्यांचे वय५९ आहे माझे ६६ आहे,हे समजले तेव्हा आधार आला. एखादी व्यक्ती स्वतःच्या कर्तव्यावर मोठा होतो.मी पाच कारखान्याला ऊस घालतो. बिल बघत असतो.दिगग्ज च्या खाली साखरेची रिकव्हरी कमी झाली. साडेतीनशे दर कमी घेतो, याचे गणित कळत नाही.लोकसभा निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील बीड मधून निवडून आले होते.त्यांच्या कार्यपद्धती प्रमाणे कष्ट व श्रम करणारे, वंचित या सर्वांचे सर्व प्रश्न सोडवले जातील.
घार्गे साहेबांनी जे भोगले ते १९९९ ला आम्ही भोगले, त्यांची व माझी काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, आम्ही भी तुरंगात गेलो,पण शरद पवार, अजितदादा पाठीशी उभे राहिले नाही. लढाई खेळतो त्याला तुरंगात जावे लागते. वीस वर्षे नीट करायला गेलो.९१ व्या वयात आदरणीय गणपतराव देशमुख होते,राजकारणात कंटाळून जाऊ नका. गळाला लागला आहे. मीच घेऊन मुंबईला जाणार आहे लाल दिव्याच्या गाडीतून घार्गेसाहेब यांना खटाव मध्ये घेऊन येतो.पक्ष, नेत्यांशी,जनतेशी, मतदारांशी बांधिलकी असल्याने जनसमुदाय जमला आहे.घार्गेसाहेब यांच्या शिवाय माण-खटाव मध्ये राजकारण दिसत नाही ते राजकारण माती मोल आहे.असे सांगून शहाजीबापू पाटील यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.यावेळी मान्यवरांनी भाषणातून शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर मंचकावर नेते, पत्रकार व कार्यकर्त्यांची घार्गे यांना शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठी गर्दी उसळी होती. तसेच जेवणाचे नियोजन फिस्कटल्याने अनेकांना नुसत्याच हेलपाटे मारावे लागले. तर काहींनी तृप्तीचे ढेकर देऊन समाधान व्यक्त केले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, उपाध्यक्ष कृणाल गडांकुश,मानसिंगराव माळवे,शिवाजीराव सर्वगोड, वैभव घार्गे, अभय देशमुख ,शिवाजीराव पवार, शैलेश जाधव, वैभव पवार,किशोर गोडसे, काका बनसोडे,डॉ संतोष गोडसे,पत्रकार अजित जगताप,आयाज मुल्ला, निलेश कणसे, केदार जोशी,संदिप पवार,धनंजय चिंचकर, दत्ता कोळी, स्वप्नील कांबळे, पोपट मिंड, मुन्ना मुल्ला, शेखर जाधव, संजय जगताप,नितीन राऊत, प्रकाश सुरमुख, फिरोज मुलाणी,सतिश पवार, समीर तांबोळी यांच्या सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत कोकरे यांनी सूत्रसंचालन केले. वसंत पोफळे यांनी आभार मानले.