दिनेश सोनवणे
दौंड : रावणगाव (ता.दौंड) येथील वैशाली जितेंद्र नेमाडे यांची भाजपच्या दौंड तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
राहू (ता. दौंड) येथील एका कार्यक्रमात भाजपचे दौंड तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांच्या हस्ते वैशाली नेमाडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल, दौंड तालुका भाजपा पदाधिकारी राजेंद्र आटोळे, पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण सामाजिक कार्यकर्ते अरुण आटोळे, सुमन नारायण कंट्रक्शनचे संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य हौशीराम आटोळे, स्वच्छ भारत अभियानचे आप्पा भोपाळ, संग्राम भोपाळ, साईराम गाढवे, अमित रांधवण, अतुल सांगळे, अनिल पोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
वैशाली नेमाडे या येथील उद्योजक व सामाजिक कामात अग्रेसर असणारे जितेंद्र शेठ नेमाडे यांच्या पत्नी असून त्यांना सामाजिक कामाचा मोठा अनुभव आहे. नेमाडे यांच्या निवडीमुळे परिसरात नागरिकांकडून त्यांचे स्वागत होत आहे.
आमदार राहुल कुल व कांचन कूल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडविणार आहे. तसेच दौंड तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना महिला आघाडीच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा वैशाली नेमाडे यांनी सांगितले आहे.