( Election News ) मुंबई : लोकसभा आणि विधानसभेच्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचे ठरल्याचे मत शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.
भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार…
संजय राऊत पुढे म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते अशी माहितीही राऊतांनी दिली. या बैठकीत आणखी काही भूमिका ठरल्याचे राऊत म्हणाले आहे.
दरम्यान, राज्यातील आणि केंद्रातील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे. ही महाराष्ट्राची कधीच परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. पण आता प्रत्येक ठिकाणी जात दाखवा, अशा प्रकारचे जात दाखवण्याचे काम राज्य करत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
बिबट्याची चाहूल अलार्मने होणार, विज्ञान प्रयोगातून विद्यार्थ्य़ांचा यशस्वी प्रयोग
फुललेला ‘पळस’ ठरतोय आकर्षण वसंत ऋतुची चाहूल, विविध अंगी फुले ही बहरली
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सासवड पोलिसांनी अवघ्या १८ तासात ठोकल्या बेड्या