Election News मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांना आता अवघे काही महिने उरले आहेत. (Election News ) त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या तयारीला सुरूवात केली आहे. (Election News ) निवडणुकांचा निकाल काय असेल, याची चर्चा विविध संस्थांच्या सर्व्हेच्या माध्यमातून होत आहे. (Election News )
‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याचे दाखवण्यात आले आहे, तर शिवसेनेसह ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची स्थिती जैसे थे राहिल तर काँग्रेसच्या जागा वाढतील, असा अंदाज या सर्व्हेमधून मांडण्यात आला आहे.
न्यूज एरिना इंडियाच्या सर्व्हेनुसार भाजपला महाराष्ट्रात १२३ ते १२९ जागा मिळतील. राष्ट्रवादीला ५५-५६, काँग्रेसला ५०-५३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय शिवसेनेला २५ आणि ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. यानंतर मागच्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५६ पैकी ४० आमदार गेले तर ठाकरेंसोबत उरलेले आमदार शिल्लक राहिले. या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार आज निवडणुका झाल्या तर एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही धक्का बसू शकतो. एवढच नाही तर काँग्रेस स्वबळावर लढली तर त्यांना फक्त २८ जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना पसंती
या सर्व्हेनुसार मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना पसंती मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांना ३५ टक्के पसंती देण्यात आली आहेत. तर अशोक चव्हाण यांना २१ टक्के, अजित पवार यांना २१ टक्के, एकनाथ शिंदे यांना १२ टक्के, उद्धव ठाकरे यांना ९ टक्के आणि इतरांना ९ टक्के पसंती देण्यात आली आहे.