पुणे : एकनाथ खडसे यांच्यावर आरोप असलेल्या भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (ता. ३०) न्यायालयामध्ये तपास करण्याच्या मागणीसाठी अर्ज सादर केला आहे.
एकनाथ खडसे यांना आघाडी सरकारमध्ये भोसरी भूखंड घोटाळा प्रकारनी खडसे यांना क्लिनचिट मिळाल्यानंतर या प्रकरणात लाचलुचपत विभागाला नव्याने तपास करण्यासाठी पुन्हा न्यायालयात अर्ज सादर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
याबाबत न्यायालयाने २६ ऑगस्ट ही तारीख पुढील सुनवणीसाठी दिली असून, २६ तारखेला न्यायालय काय आदेश करणार आहे. याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेलं आहे.