(Hasan Mushrif ED Raid ) मुंबई : राष्ट्रावादी काॅग्रेस पक्षाचे आणि माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कुटुबीयांची इडीने तब्बल साडे नऊ तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. इडीने त्यांच्यावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा छापमारे केली आहे. अधिकारी मुश्रीफ यांच्या घरातून साडे चारच्या सुमारास बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रिंटरही सोबत आणला होता. अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
विरोधकांची मोदी सरकारवर टीका…!
मुश्रीफांवर झालेल्या कारवाईमुळे विरोधकांनी मोदी सरकारव टीकी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर केवळ विरोधकांवरच कारवाई करण्यासाठी या यंत्रणा काम करत असल्याचा घणाघाती आरोप केली आहे. तसेच राज्याचे माजी मंत्री यांच्या कुटुंबावर तर तब्बल 109 वेळा कारवाई केल्याची माहिती देखील सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, ईडीनेकेलेल्या छापेमारीवर मुश्रीफांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे.