Draupadi Murmu News : वर्धा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला विदर्भ दौरा करण्याचे पक्के केले आहे. त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. राष्ट्रपती मुर्मू यांना गतवर्षी निमंत्रण मिळाले होते. येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने हे निमंत्रण दिले होते. त्याचा स्वीकार केल्याचे पत्र अखेर पोहोचले.(Draupadi Murmu News)
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला विदर्भ दौरा करण्याचे पक्के केले आहे.
दरम्यान, आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबाबत बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संभाव्य आगमनाबाबत या वेळी चर्चा झाली.(Draupadi Murmu News) हिंदी विद्यापीठात दीक्षांत सोहळ्यास उपस्थिती व भव्य सभागृहाचे लोकार्पण असे कार्यक्रम होतील. त्यानंतर सेवाग्राम आश्रम भेट असे तीन कार्यक्रम सहा जुलैला होणार आहेत.
गडचिरोली येथील समारंभ आटोपून राष्ट्रपतींचे आगमन हेलिकॉप्टरने वर्धा येथे होणार आहे. वर्धा येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या नागपूरला जाणार आहेत. अद्याप राष्ट्रपती भवनातून मिनिट टू मिनिट कार्यक्रमाची रूपरेषा आम्हाला मिळालेली नाही.(Draupadi Murmu News)