जनार्दन दांडगे
उरुळी कांचन, (पुणे) : येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूकीत ६४ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे पतसंस्थेवर कोणाची वर्णी लागणार याचा कौल मतदारपेटीत बंदीस्त झाला आहे.
डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेत २० जागांसाठी बुधवारी (ता. ०४) मतदान पार पडले. पतसंस्थेचे एकूण ७४१९ मतदान असून त्यापैकी ४५९२ जणांनी मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी दिली. गुरुवारी (ता. ०५) कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती येथील एका खाजगी मंगल कार्यालयात मतमोजनी होणार आहे.
या निवडणुकीत डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखालील “डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल” रिंगणात उतरला होता. तर अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या ताब्यातून पतसंस्था आपल्या ताब्यात मिळावी यासाठी सुनील जगताप, यांच्या नेतृत्वाखाली “डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल” रिंगणात उतरला होता.
पतसंस्थेची सत्ता आपल्या हातात राहावी म्हणून राजेंद्र कांचन व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्व ठिकाणी प्रचारात आघाडी घेतली होती तर पतसंस्थेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी सुनील जगताप यांनी राजेंद्र कांचन यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. प्रत्यक्ष प्रचारादरम्यान निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी, पारंपारिक प्रचाराला आधुनिकतेची जोड दिल्याने प्रचाराची रंगत वाढली होती. सकाळपासुन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मताचे दान आपल्यालाच मिळावे यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते धावपळ करत होते.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदानाच्या वेळी ग्रामपंचायत हद्दीच चोख बंदोबस्त ठेवला होता.
शाखानिहाय झालेले मतदान :-
उरूळी कांचन – २२६१, मार्केट यार्ड – २४४, धायरी – २१७, हडपसर – ३६४, वाघोली – २९८, निगडी – ३७२, शिरूर – २५०, केडगाव – ५८६
पतसंस्थेचे एकूण मतदान :- ७४१९ , झालेले मतदान – ४५९२ , एकूण ६४ टक्के