उरुळी कांचन : तरडे (ता. हवेली) येथील ज्ञानेश्वर विठ्ठल दगडे यांची भारतीय जनता पार्टीच्या पूर्व हवेली तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे भाजपाच्यावतीने मंगळवारी (ता.१) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्ञानेश्वर दगडे यांना भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद व भाजपा हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्याहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, रेल्वे क्षेत्रीय समिती सदस्य अजिंक्य कांचन, तरडेचे माजी सरपंच मारुती बरकडे, सतीश केसकर, अमर काळे. सुदाम गडदे, प्रदीप मेमाणे व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तेच पक्षाने दिलेली जबाबदारी चोख पार पडून, पूर्व हवेलीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडूननंतर बोलताना नवनिर्वाचित पूर्व हवेली उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दगडे यांनी सांगितले आहे.