DHFL Bank | Big Breaking पुणे : डीएचएफएल बँक (DHFL Bank) कर्ज बुडविल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांची शिवाजीनगर येथील शिवाजी गृहनिर्माण सहकारी संस्था येथील सर्व्हे नं १०३, प्लॉट नं. ६२ या त्यांच्या मिळकतीसह बंगला जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मात्र, पुढील आदेश येईपर्यंत बंगला प्रातिनिधिक स्वरूपात ताब्यात घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी (ता. १७) मार्चला होणार आहे.
काकडे यांनी शिवाजी गृह निर्माण सहकारी संस्थेची मिळकत, बंगला आणि काकडे पॅराडाईज या तिन्ही स्थावर मालमत्ता लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक, इंडिया बुल्स हाऊसिंग प्रा. लि. आणि समता नागरी को- ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडे गहाण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते.
दरम्यान, त्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने दि. २४ ऑगस्ट २०१८ रोजी कोर्ट रिसिव्हरची नियुक्ती करून काकडे यांची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याचे आणि त्याची विक्री करण्याचे अधिकार दिले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Gautami Patil : गौतमी पाटीलचा ;तो’ व्हिडिओ पुन्हा चर्चेत; एसआयटी चौकशीची मागणी
MSRTC News |राज्यातील महिलांसाठी खुशखबर! आजपासून महिलांना एस टी बस प्रवासात ५० टक्के सवलत
Sassoon Hospital : आरोग्य व्यवस्थेवर ताण ! ससून रुग्णालयाने घेतला ;हा महत्वाचा निर्णय