मुंबई : Devendra Fadnavis – शेतकऱ्याला वर्षाला एकरी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फिडर सोलरबाबर निर्णय घेण्यात आला आहे. (Devendra Fadnavis) तसेच शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा त्याचप्रमाणेवर्ष 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. (Devendra Fadnavis)
कोणाला मिळणार योजनेचा फायदा
या शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे मिळत राहणार फायदा, हा फायदा पडीक जमिन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे मिळत राहणार आहे. सोलार पॅनल लावण्यासाठी जर शेतकऱ्याने 30 वर्षांच्या करारावर त्याची जमिन राज्य सरकारला दिली तर त्या बदल्यात राज्य सरकार त्या शेतकऱ्याला वर्षाला एकरी पन्नास हजार रुपयांचे भाडे देणार आहे.
महत्वाचे म्हणजे या भाड्यामद्ये दर वर्षाला ३ टक्क्यांची वाढ होणार आहे. सोलारसाठी मोठे गुंतवणूकदार पैसे गुंतविण्यास तयार आहेत. यामुळे ही वीज राज्य सरकारला 3 रुपये 30 पैसे प्रति युनिट अशी पडेल. कोळशामुळे होणारी पर्यावरणाची हानी देखील होणार नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
नागपूरला एअरबस प्रकल्प येऊ नये, म्हणूनच गुजरातला जाऊ दिला देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर आरोप
पुण्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उद्यापासून कामबंद आंदोलन