पिंपरी Devendra Fadnavis : वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आम्ही राज्य सरकारकडून पाण्याचे अतिरिक्त आरक्षण दिले. कारण, पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचरा समस्या निर्मूलन या बाबी शाश्वत विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. (Devendra Fadnavis) चिखलीतील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रामुळे शहरातील पाणी पुरवठा सक्षम होईल. मात्र, एकूण २६७ एमएलडी पाणी पुरवठ्याबाबत प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. (Devendra Fadnavis) तोपर्यंत वाढत्या नागरिकरणानुसार, सक्षम पाणीस्त्रोत निर्माण होणार नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत प्रस्तावित भूमिसंपादन एक महिन्याच्या आत पूर्ण करावे आणि जागेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरण करावे. (Devendra Fadnavis) आवश्यकता वाटल्यास उच्चस्तरीय बैठक घ्यावी. (Devendra Fadnavis) आगामी दोन वर्षांत पिंपरी-चिंचवडला पिण्याचे मुबलक पाणी मिळाले पाहिजे, अशा सूचना राज्याचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या आहेत. (Devendra Fadnavis)
शहरातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
निगडी प्राधिकरण येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महापालिका प्रशासकीय भवन, भामा आसखेड प्रकल्पांतर्गत जॅकवेल उभारणी, चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पासह विविध २२ विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर माई ढोरे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका माया बारणे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
तत्पर्वी, चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, महापालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आणि तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये सर्व प्रकल्प आणि विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी ग. दि. माडगूळकर यांची चौथी पिढी सुमित माडगूळकर आणि परिवाराचा सन्मान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या कोणत्याही कार्यक्रमात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची आठवण होते. मराठी माणसांसाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. गीतरामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचे जीवन अजरामर करणारे ग. दि. माडगूळकर यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. या नाट्यगृहामुळे शहराची उंची वाढली आहे. ‘‘दिन में तारे दिखाए…’’ असे म्हटले जाते. त्याची अनुभती शहरातील तारांगण प्रकल्पात आली. नव्या पिढीला विज्ञानाकडे आकर्षित करण्याचे काम तारांगणच्या माध्यमातून होईल. पिंपरी-चिंचवड शहराची नवीन प्रशासकीय इमारत उभारली जात आहे. त्या इमारतीमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारीही नागरिकांप्रति संवेदनशील असले पाहिजेत.
पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निर्माण करीत असतानाच सांडपाण्याचा पुन:वापर याबाबतही विचार केला पाहिजे. औद्योगिक कंपन्यांना लागणारे ५० एमएलडी पाणी सांडपाणी प्रक्रिया केलेले घ्यावे. सिंचन किंवा पिण्याचे पाणी औद्योगिक वापरासाठी देण्यात येणार नाही, असा नियम केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण होणारे प्रतिदिन ३०० एमएलडी पाणी यावर प्रक्रिया करुन औद्योगिक वापरासाठी दिले, तर शहरे आणि गावांतील दरी कमी होईल. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण रोखता येईल. त्याद्वारे ‘सस्टेनेबल सीटी’च्या दिशेने वाटचाल करता येईल.
शहरांमधील कचऱ्यांच्या डोंगरावर प्रक्रिया केली जाईल. कचऱ्याचे डोंगर नष्ट केले जातील. पिंपरी-चिंचवडमधील गावपण आणि आधुनिकीकरण अशी संस्कृती जपत शहराचा विकास करण्याचे ध्येय आहे. शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत वेगाने निर्णय घेण्यात येईल. पिंपरी-चिंचवडला ‘सेप सिटी’ करण्यासाठी पोलीस प्रशासन बळकट केले जाईल, असा दावाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहराच्या स्थापनेपासून एकच पवना धरणाचा स्त्रोत होता. त्यानंतर ५२ वर्षांनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकाळात दुसरा स्त्रोत निर्माण झाला. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पामुळे शहर पाण्याबाबत आत्मनिर्भर होणार आहे. मोशीमध्ये १९७२ पासून कचरा टाकला जात होता.
त्यामुळे वेस्ट टू एनर्जी सारखा प्रकल्प फडणवीस यांच्याच सत्ताकाळात हाती घेतला. समाविष्ट गावांमध्ये २०१७ ते २०२३ मध्ये जी विकासकामे झाली, ती गेल्या २० वर्षांत झाली नव्हती. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी शिंदे-फडणवीस दूरदृष्टीने काम करीत आहे. ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाला मंजुरी मी स्थायी समिती सभापती असताना दिली होती. स्थानिक नगरसेवकांनी या कामासाठी पुढाकार घेतला. त्या नाट्यगृहाचे उद्घाटन आज होत आहे, याचे विशेष समाधान वाटते.
पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शहरांच्या विस्ताराप्रमाणे आवश्यक प्रकल्प हाती घेतले जातील. पाणी, रस्ते, सुरक्षा याबाबत प्रशासन आणि नागरिक यांनी जबादारी घेतली पाहिजे. पवना धरणग्रस्तांनी मध्यंतरी आंदोलन केले. त्यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन ‘शिवनेरी’ नवा जिल्हा करा : आमदार लांडगे
स्वतंत्र पोलीस आयुक्तायला मान्यता मिळाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत आहे. तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तार वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे आणि ‘शिवनेरी’ हा नवा जिल्हा करावा व पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र्य तालुका म्हणून निर्मिती करावी. शास्तीकराचे ओझे सर्वाधिक माझ्यावर होते. कारण, लोक वारंवार विचारत होते. शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले? पण, देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर पूर्ण माफ केला. त्याचा आनंद सर्वाधिक झाला.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ २०० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल, मोशीत ८५० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येत आहे. शहराचा सर्वांगीण विकास होत असताना शहरातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये चमकावा. याकरिता कबड्डी आणि कुस्तीसारख्या पारंपरिक खेळांनाही प्रोत्साह द्यावे.
पथारीधारकांचे प्रश्न मार्गी लावा : खासदार श्रींरग बारणे
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, १९९९ मध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना तारांगण प्रकल्पाच्या उभारणीसाठी जर्मनीच्या कंपनीला काम दिले होते. मात्र, मी वेगळा पक्षाचा नगरसेवक होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती. त्यामुळे तत्कालीन नेत्यांनी तारांगण प्रकल्पाचे अर्थसंकल्पातून हेडच काढून टाकले. मात्र, ३२ वर्षांनंतर तारांगण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. २२ वर्षांपूर्वी मीच या प्रकल्पाचे काम सुरू झाले. भाजपाच्या काळातील चांगल्या कामांना आम्ही पाठिंबा दिला. अनेक प्रकल्प राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत.
पवना नदी सुधार प्रकल्प, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प मार्गी लागले पाहिजे. अशुद्ध पाण्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पवना प्रकल्प कार्यान्वयीत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शास्तीकर संपूर्ण माफ झाला, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, प्राधिकरण हद्दीतील लहान घरांना नियमिती करण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घ्यावा.
साडेबारा टक्के परताव्याबाबत निर्णय घ्यावा. ‘स्मार्ट सिटी’च्या योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी मिळत आहे. शहर आणि रस्ते प्रशस्त होत आहे. मात्र, शहरातील पथारीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांना न्याय देण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली. पुणे ते लोणावळा या भागातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याबाबत खासदार बारणे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली.
‘मोस्ट लिव्हेबल सिटी’ घडवणार : आयुक्त शेखर सिंह
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, शहराची ओळख भारतातील सर्वाधिक गतीने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत. ‘कॉलिटी ऑफ लाईफ’ या हेतूने एकूण ८५६ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकर्पण होत आहे. पाणी प्रकल्पाचे विविध प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन-तीन वर्षांत पिंपरी-चिंचवड पाण्याच्या बाबतील स्वर्यंपूर्ण होईल.
‘जल्लोष शिक्षणाचा’ हा शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. यापुढे पीसीएमसीतील सर्व शाळांचे पीसीएमसी पब्लिक स्कूल असा प्रचार व प्रसार करण्यत येणार आहे. शहराच्या आरोगय क्षेत्रात ‘पिऱ्यामीड स्ट्रक्चर’ च्या सूत्रानुसार पुढाकार घेण्यात जाणार आहे. क्रीडा, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजनेंतर्गत ‘लाईट हाउस’ संकल्पना राबवली जाते. दिव्यांग नागरिकांसाठी ‘निरायमय वीमा आरोग्य योजना’ हाती घेतली आहे.
शहरतातील मिळकतींचे सॅटेलाईट मॅपिंग होणार आहे. शहरातील ‘क्लिनेस्ट सिटी इन इंडिया’ म्हणून वाटचाल करण्याचे ध्येय आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प, सेंट्रल लायब्ररी, आयटीआयचा आधुनिक कॅम्पस, वाकड-भोसरी-चाकण अशी नवीन मेट्रो लाईन असे प्रकल्प हाती घेण्यात येतील. शहराला शहराला देशातील ‘मोस्ट लिव्हेबल सिटी’ घडवण्यासाठी आम्ही काम करित आहोत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Devendra Fadnavis : फडणवीस पुन्हा येणार ? एकनाथ शिंदेंचे टेन्शन वाढले ?