पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री मंडळ विस्तार झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्चस्वला शह देण्यासाठी फडणवीस हा निर्णय घेऊ शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहे.
आगामी महापालिका निवडणुकांत भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी तसेच पुणे परिसरात पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी फडणवीस पालकमंत्री होऊ शकतात.
पुणे जिल्ह्याच्या ८७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शिंदे सरकारने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी कॉँग्रेसला मात देण्याचा हा भाग असल्याचे त्यातून सूचित होत असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.