नागपूर : दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या कामकाजादरम्यान थरारक घटना घडली. एका घटनेमध्ये दोन युवकांनी संसदेच्या परिसरात स्मोक कँडल पेटवण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या घटनेमध्ये दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून संदसेद उतरूनस्मोक कँडल पेटवल्या. दोन्ही घटनेत तरुणांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. यापैकी एका घटनेतील तरूण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे. लोकसभेतील घुसखोरीची घटना घडल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं पोलीस महासंचालकांना फोन केला आहे. या घटनेतील आरोपी महाराष्ट्रातील असल्यानं त्यांची लवकरात लवकर माहिती घ्या असे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,अमोल शिंदे नावाचा मुलगा महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे हे आंदोलन मराठा आरक्षण संदर्भात आहे का याची माहिती घेतली पाहिजे. संसदेत झालेल्या घटनेनंतर विधानभवनाच्या सुरक्षेसंदर्भात सुद्धा पाऊले उचलली गेली पाहिजेत. ज्यांनी घोषणाबाजी केली किंवा जे संसदेत घुसले ते कुठल्या संघटनेचे होते हे सुद्धा पहावे लागेल. त्यांचं म्हणणं समजून घ्यावे लागेल.
संसदेत झालेल्या घटनेचे पडसाद हे राज्याच्या अधिवेशनातही उमटल्याचे दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या विधान भवन परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधिमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना यासंबंधित निर्देश दिले आहेत.
अमोल शिंदे हा लातूल जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील थोरली झरी गावचा आहे. त्याचे शिक्षण 12 वी असून तो नोकरीच्या सोधात आहेत. त्याचे आई वडील शेतात मजुरी करतात तर एक भाऊ पनवेलला रिक्षा चालवतो. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. नीलम ही हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे. तिचे वडील उचाना येथे मिठाईचे दुकान चालवतात. नीलम हीडाव्या विचारसरणीच्या असून शेतकरी चळवळीतही ती सक्रिय होती. त्याचसोबत नीलम हरियाणा सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत होती.