दिनेश सोनवणे
दौंड : निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाचच मिनिटात मशाल हे चिन्ह सर्व मराठी माणसाच्या घराघरात पोहोचल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे पुणे उपजिल्हा उपप्रमुख अनिल सोनवणे यांनी केले.
दौंड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी दौंड शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिक जमले होते. निवडणूक आयोगाने शिवसेनेला अंधेरी येथील निवडणुकीसाठी मशाल चिन्ह व पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दिले आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी दौंड शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिक जमले होते. यावेळी उपप्रमुख अनिल सोनवणे बोलत होते.
यापुढे बोलताना अनिल सोनवणे म्हणाले, ‘१९८५ मध्ये आमचे चिन्ह मशाल होते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला मशाल हे चिन्ह मागितले. त्यानुसार आयोगा कडूनहि मशाल या चिन्हाला मान्यता दिल्या मुळे आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानत आहोत. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.