Daund दौंड : भीमा पाटस साखर कारखान्याचे संस्थापक मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला खासदार संजय राऊत यांनी पुष्पहार अर्पण होता. त्यामुळे भीमा पाटस कारखान्याच्या कामगारांनी शितोळे यांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण केले आहे. तसेच यावेळी राऊतांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी कारखान्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुतळ्याचे शुध्दीकरण केल्याने आता नव्या वाद तोंड फुटणार असल्याचे बोलले जात आहे.
संजय राऊत यांची सभा…!
बुधवारी (ता.26 ) संजय राऊत यांची सभा झाली, सभेला जाण्यापूर्वी राऊतांनी शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी सभेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्यासह आमदार राहुल कुल यांचा चांगलाच समाचार घेतला.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरुन सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कारखान्यात तब्बल
500 कोटीं रुपयांचा भ्रष्टाचार आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सीबीआयकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वरवंड येथे खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा झाली.