जीवन शेंडकर
बोरीऐंदी, ता. ०८ : तरुणांनी राजकारणाआधी व्यवसायात वाटचाल करावी, स्वतः व्यवसायाच्या जोरावर सक्षम बनावे आणि मग इतर कामात लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन विधानसभा हक्कभंग समिती अध्यक्ष, भाजप आमदार राहुल सुभाष कुल यांनी केले.
शिरवळ (ता. भोर) असे जोगेश्वरी मिसळ व भेळ येथील शाखेच्या उद्घाटन राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुल बोलत होते.
पुणे जिल्ह्यातील केसनंद येथे व्यवसायाची सुरुवात करून, प्रशस्त जागा, स्वादिष्ट चव व स्वच्छतेवर भर देऊन आज संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे पेक्षा जास्त शाखा जोगेश्वरी मिसळ आणि भेळ उद्योग समूहाच्या झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, बेंगलोर हायवेला पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात येणे जाणे असते, त्यामुळे परिसरातील व्यवसायिकांना मोठा फायदा होतो.
भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे म्हणाले, “तरुणांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी चांगल्या प्रकारे ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे नियोजनात्मक काम करावे, व्यवसायासाठी तरुणांना माझ्या भरभरून शुभेच्छा..
यावेळी सातारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, माजी सभापती राजेंद्र तांबे, मुरलीधर भोसेकर, महादेव यादव, गुरुदेव बरदाडे, अनुपजी सुर्यवंशी, प्रदीप माने, सरपंच रविराज दुधगावकर, राजेंद्र तावरे, लक्ष्मी पानसरे, ताहेर काझी, महेश जाधव आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.