संदीप टुले
Daund News : दौंड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. कारण त्यांच्या पक्षाचा प्रचार करणारी गाडी दौंड तालुक्यापर्यंत पोहचल्याचे केडगावात दिसली. त्या गाडीला पक्षाचा झेंडा पक्षाचे चिन्ह असलेले पोस्टर, स्पीकर्स तसेच पक्षाने दिलेल्या आश्वासनाचे पोस्टर या गाडीवर पाहायला मिळत होते.
चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष तेलंगणासह महाराष्ट्रात प्रवेश करू इच्छित आहे. त्यानुसार, पक्षाकडून मोर्चेबांधणी देखील सुरु आहे. त्यात दौंड तालुक्यात प्रचार यंत्रणा केडगावपर्यंत गेल्याचे दिसत आहे. (Daund News) केडगावमधील नागरिक या पक्षाचा मूळ अजेंडा आवर्जून वाचताना पाहायला मिळाले. त्यांच्या अजेंड्यावर शेतकऱ्यांसाठी उच्च दाबाने 24 तास मोफत वीज, शेतकऱ्यांना मोफत पाणी, शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार एकरी मदत, शेतकऱ्यांना 5 लाखांचा जीवन विमा, दलित कुटुंबांना व्यवसायासाठी 10 लाखांचे अनुदान अशा आश्वासनांचे फलक पाहायला मिळाले.
बीआरएस पक्ष दौंड तालुक्यात उमेदवार उभा करणार
आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा बीआरएस पक्ष दौंड तालुक्यात उमेदवार उभा करणार असे यावरून दिसत आहे. दौंड तालुक्यातील राजकारणात नेहमीच कुल आणि थोरात यांच्यातच ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळते. (Daund News) 2019 च्या विधानसभेला तर आमदार राहुल कुल हे जेमतेम 700 ते 750 मतांनी निवडून आले होते. त्यामुळे बीआरएसचा उमेदवार नेमका कुणाच्या मतांवर डल्ला मारेल हे पाहण्यासारखे असेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : सुप्रिया सुळे यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी थापल्या भाकरी तर हाटले बेसन
Daund News : कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; १६ गोवंशाची सुटका ..
Daund News : पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथे भीषण अपघात !