(Daund News ) दौंड, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या बाजूला तसेच दौंड शहरातील मुख्य चौकात भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केलेल्या ५०० कोटींच्या कथित भ्रष्टाचारावर आवाज उठवल्याबद्दल दौंड (Daund News) तालुक्यात खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर पहायला मिळू लागले आहेत.
खासदार संजय राऊत यांचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर आरोप
खासदार संजय राऊत यांनी दौंड भाजपचे आमदार आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर आरोप केल्यानंतर दौंड तालुक्यातील कुल समर्थकांनी टिकेची झोड उठवली. तर राऊत यांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करीत ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो, पुतळ्याचा दहन करून निषेध नोंदवला होता.
राऊत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मालकीच्या असलेल्या भीमा पाटस सहकार कारखान्यातील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला तोंड फोडले.. मग कर नाही तर डर कशाला? चौकशीला सामोरे जा, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीने जाहीर आभार..! अशा आशयाचे बॅनर पुणे – सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या बाजूला तसेच दौंड शहरातील मुख्य चौकात दिसू लागले आहेत.
दरम्यान, त्यालाच प्रत्युत्तर म्हणून खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे फलक सध्या दौंड तालुक्यात झळकले आहेत. एकीकडे आमदार कुल यांच्या समर्थकाकडून खासदार राऊत यांचा निषेध सुरू असताना, दुसरीकडे खासदार राऊत यांच्या आभाराचे बॅनर लागल्याने तालुक्यात भीमा पाटसच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी आज संपावर ; कामकाजावर होणार परिणाम!
Sharad Pawar : गळ्यात कांद्याच्या माळा घालणारे भाजपवाले कुठे गेले ?? शरद पवारांचा सवाल!