Encouraging News : शेगाव: सत्तेतून पैसा, पैशांतून राजकारण आणि त्यातून सत्ता असे समीकरण चांगलेच साधले जाते. राजकारणात टक्केवारीला महत्व अधिक दिले जाते. मात्र एका महिला सरपंचाने विकास कामांच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांचा हिशोबच ग्रामस्थांमध्ये पुढे सादर करुन एक वेगळेच उदाहण निर्माण केले आहे. यामुळे या महिला सरपंचाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. (Courage of Women Sarpanch; Account of the money received in the commission was presented to the villagers)
तब्बल 22 लाख रुपये विकासासाठी खर्च करणार
जळंब (ता. शेगाव) येथील महिला सरपंच मंगला घोपे असे त्यांचे नाव आहे. या महिला सरपंचांनी अडीच वर्षात किती कमिशन घेतले याचा हिशोबच गावकऱ्यांसमोर माडला आहे. आणि त्यांनी गावचा सर्वागिण विकास साधण्यासाठी २२ लाखांच्या कमिशनचा हिशोब गावकऱ्यांना दिला.
गावात होणाऱ्या प्रत्येक कामात सरपंचाला वेगळे कमिशन ठरलेले असते. सरपंचाला कमिशन देणे हा पूर्वापार चालत आलेला अलिखीत नियम आहे. त्यामुळे कमिशन घेणे हा सरपंचाचा हक्कच बनला आहे. वेळप्रसंगी कमिशनसाठी काम अडविणे, ठेकेदारांना वेठीस धरणे असेही प्रकार होतात. कोणत्या कामात किती कमिशन घेतले कुणीच कुणाला सांगत नाही, हे सर्व गुलदस्त्यात असते. परंतु आपण अडीच वर्षात किती कमिशन घेतले याचा हिशोबच सरपंच मंगलाताई घोपे यांनी गावकऱ्यांसमोर मांडण्याचे काम केले आहे.
सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक असतो. (Encouraging News ) मात्र विविध कामांच्या माध्यमातून कमिशन घेत लाखोंचा मलिदा जमा करण्याचे पद म्हणजे सरपंच, अशी प्रतिमा गत काही वर्षांत निर्माण केली जात असून त्याच दृष्टीने सरपंचाकडे सदर पाहीले जाते. त्यातच महिला सरपंच असल्यास संपूर्ण कारभार पतीच्याच हाती असतो आणि महिला राज नव्हे तर पतीराज निर्माण होते, असेही दिसून येते. परंतु याला जळंब हे गाव अपवाद ठरले आहे.
जळंब गावच्या सरपंचा मंगलाताई घोपे यांनी अडीच वर्षाच्या मिळालेल्या कार्यकाळात गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. निस्वार्थपणे केलेल्या कामामुळे आज गावात विकास कामे स्पष्ट दिसून येत आहेत. (Encouraging News ) अडीच वर्षांमध्ये जवळपास अडीच कोटींची विकास कामे या सरपंच आणि येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या हातून झाली. यामधून सरपंचास रीतसर कमिशनही मिळाले. परंतु, हा कमिशनचा पैसा स्वतःसाठी न ठेवत त्याचाही गावातील विकासकामांसाठी त्यांनी वापर करुन त्याची वेगळी नोंद ठेवली.
अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी गावात एक मोठा कार्यक्रम घेतला. (Encouraging News )आणि गावकऱ्यांसमोर संपूर्ण कमिशनचा हिशोब सादर केला. कमिशन म्हणून मिळालेल्या २२ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा हिशोब गावकऱ्यांसमोर मांडला. एकढेच नव्हे तर अडीच वर्षात केलेली विकासकामे त्याचे इस्टिमेट, मिळालेला निधी, झालेला खर्च आणि कमिशन याचा संपूर्ण गोषवारा सादर केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune ZP News : काम नाकारणार्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा जिल्हा परिषदेचा इशारा
Pune Crime : सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरट्यांना अटक; वानवडी पोलीसांची कामगिरी