राहुलकुमार अवचट
यवत : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे बारामती येथील नियोजित मेळाव्यासाठी पुणे – सोलापूर महामार्गावरुन जात असताना दौंड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्तांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्या समवेत पुरंदरचे आमदार व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जगताप व जिल्हा पदाधिकारी होते, डाळींब गावचे लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच बजरंग म्हस्के यांचा नाना पटोले यांच्या हस्ते शाल, नारळ व पुष्पगुच्छ सन्मानित करण्यात आले.
यावेळी यवतचे उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, कॉंग्रेसचे दौंड विधानसभा अध्यक्ष विठ्ठल दोरगे, परिवहन विभाग अध्यक्ष मोहसिन तांबोळी, माजी जि.प सदस्य गणेश कदम, माजी पं.स. सदस्य कुंडलिक खुटवड, दिलीप यादव, रोहन दोरगे, समता परिषदेचे मंगेश रायकर, सारिका भुजबळ, माणिक दोरगे, माजी ग्रामपंचायत सदस्य साजिद सय्यद, राजेंद्र मलभारे, दौंड कॉंग्रेसचे पदाधिकारी, यवत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.