इंदूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते माजी आमदार राज पटेरीया यांना मध्य प्रदेश पोलिसांनी आज पहाटे साडे पाचच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कार्यकर्त्यांना संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य करताना राजकीय खळबळ उडवून दिली होती.
काँग्रेसचे मध्य प्रदेशातील माजी आमदार राज पटेरीया यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यात भाषण करताना पटेरीया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रक्रिया संपुष्टात आणतील. तसेच मोदी हे धर्म, जाती आणि भाषा या मुद्द्याच्या आधार लोकांमध्ये फूट पादातील. यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक लोकांचे भवितव्य धोक्यात आहे.
देशाचे संविधान वाचवायचे असेल तर मोदी याची हत्या करण्यास तयार असले पाहिजे. हत्या म्हणजे त्यांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काम करा, असे वक्तव्य पटेरीया यांनी केले होते.
मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका गावात काँग्रेस नेते राज पटेरीया यांनी भाषण केले होते. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याचे म्हटले जात आहे. या विधानासाठी स्पष्टीकरण देखील दिले होते. मात्र, पटेरीया यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली.
काँग्रेस नेत्यांची पंतप्रधान मोंदी संदर्भात वादग्रस्त विधानाची मालिका कायम…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून हा वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला सुरूच आहे. त्यानंतर देखील मोदी हे तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडणून आले होते.
राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्यानंतर देखील काँग्रेसच्या जवळपास सगळ्याच मोठ्या नेत्यांनी मोदींविषयी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. सन २०१४ च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी देखील हाच कित्ता काँग्रेस नेत्यांनी गिरविला होता. त्यानिवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले होते. सन २०१९ साली देखील हीच वादग्रस्त वक्तव्यांची परंपरा काँग्रेसने सुरूच ठेवली होती.
त्यानंतर देखील अनेक विविध पक्षातील नेते असे अनेक वादग्रस्त वक्तव्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात करत आहेत, हेच पुन्हा एकदा पटेरीया यांच्या विधानाने अधोरेखित झाले आहे.