अतुल जगताप
वडूज : भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलसाठी वृत्त व छायाचित्र तसेच भूमिका निष्ठावंतपणे मांडणारे वडूज नगरीचे सुपुत्र शेखर सुरेश पाटोळे यांची भाजप सोशल मीडिया संयोजक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा खटाव येथे सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत पक्षाची भूमिका सकारात्मक रित्या मांडण्यासाठी तसेच पक्षाच्या विरोधी पोस्ट टाकणाऱ्या मान्यवरांना उत्तर देणे. अशी भूमिका निस्वार्थीपणाने व विना शुल्क करणारे युवा कार्यकर्ते शेखर पाटोळे हे भाजपचे पायरीवरचा दगड ठरलेले आहेत. त्यांच्या निष्ठावंत भूमिकेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गाडे, सातारा जिल्हाध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी व भाजप प्रदेश सचिव विक्रम पावसकर,जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, महिला जिल्हाध्यक्ष गीता लोखंडे, तसेच भाजप माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे व विकल्प शहा, अनिल माळी, प्रदीप शेटे मान्यवरांनी शेखर पाटोळे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
सोशल मीडिया म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत पक्ष व संघटनेची भूमिका पोहोचवणारे शस्त्र आहे. याचा लोकशाही मार्गानेच वापर करणे गरजेचे आहे अशी भूमिका घेणारे शेखर पाटोळे हे एकाच वेळेला सुमारे पन्नास ग्रुपवर भाजपची भूमिका मांडत आहेत. वैयक्तिकरित्या एखाद्या पक्षाच्या समर्थकाचे वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु वडूज नगरीच्या सुपुत्राला हा जो बहुमान मिळालेला आहे. त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार नितीन राऊत, आकाश यादव, अजित जगताप व मार्गदर्शक पत्रकार मुन्ना मुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा करण्यात आला.
भाजपचे माजी नगरसेवक श्रीकांत तथा काका बनसोडे यांच्या हस्ते मानाचा फेटा व श्रीफळ प्रदान करण्यात आले. एखाद्या राजकीय पक्षाच्या भूमिका मांडताना जे चांगले विचार आहेत ते आत्मसात करून ज्या काही सूचना आहेत. त्याचे पालन करणे. हाच सोशल मीडियाचा उद्देश आहे. हा उद्देश साध्य करताना कोणाच्याही भावना दुखवू नये. याची खबरदारी घेऊन तसेच उपयुक्त सूचनांचा आदर करून सोशल मीडिया संयोजक म्हणून कार्यरत होत असताना समाधान वाटत आहे. या सत्कारामुळे माझी नैतिक जबाबदारी वाढली असून लवकरच वडूज नगरीच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्याचे मनोगत सत्कारला उत्तर देताना शेखर पाटोळे यांनी सांगितले.